HEPA एयर प्युरीफायर्स

केंट HEPA एयर प्युरीफायर्स HEPA डस्ट कलेक्शन तंत्रज्ञान वापरतात जे प्रभावीरीत्या 99.9% प्रदूषकांना काढतात जसे की कणदार पदार्थ (PM 2.5), धूळ, पाळीवांचे केस, वायू, सिगारेटचा धूर तसेच इतर प्रदूषक. HEPA फिल्टर्सची उच्च शुध्दीकरण क्षमता खोलीला लगेचच शुध्दीकृत करतात.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे HEPA एयर प्युरीफायर्स

ओझोन एयर प्युरीफायर्स

केंट ओझोन एयर प्युरीफायर्स ओझोन निर्जंतुकीकरण तंत्रज्ञानाला वापरून घराच्या आतील हवेला स्वच्छ ठेवण्यात सहाय्य करतात. एयर प्युरीफायर्स ओझोन निर्माण करतात, जो एक दमदार ऑक्सिडायझिंग एजंट आहे व घराच्या आतमधील हवेत उपस्थित असलेले बॅक्टेरिया, विषाणू तसेच इतर हानिकारक सूक्ष्म जीवधारींना मारण्यासाठी त्याच्याकडे विलक्षण बल असते.

सर्वोत्तम विक्री होत असलेले आमचे ओझोन एयर प्युरीफायर्स

केंटकडून एयर प्युरीफायर्स का विकत घ्यावे

केंटच्या एयर प्युरीफायर उत्पादनांची शृंखला घराच्या आतमधील हवा प्रदूषक रहित बनवण्यासाठी क्रांतिकारी ‘HEPA एयर प्युरीफिकेशन’ तसेच ‘ओझोन निर्जंतुकीकरण’ तंत्रज्ञाने वापरतात. सोयीसाठी, आम्ही रूम एयर प्युरीफायर मशीन्सना अशा आकारांमध्ये रचनाकृत केले आहे जी भिंतीवर बसवली किंवा टेबलावर ठेवली जाऊ शकतात.

जपानी हवा शुध्दीकरण तंत्रज्ञानासह, आम्ही आपली घरे, कार्यालय आणि कारला आरोग्यदायी ठीकाण बनवण्यासाठी भारतामध्ये सर्वोत्तम एयर प्युरीफायर्स सादर करतो. आमच्या रूम एयर प्युरीफारयर्सची शृंखला धूळ, PM 2.5, बॅक्टेरिया तसेच इतर हवा प्रदूषकांना 99.9% अचूकतेने काढून टाकत घराच्या आतमधील हवा शुध्द करते. आपण केंटच्या वेबसाईटवरून भारतामध्ये आपल्या घरासाठी सर्वोत्तम एयर प्युरीफायर्स विकत घेऊ शकता, आम्ही1999 पासून एक विश्वसनीय ब्रँड आहोत.

  • भारतातील नवी दिल्ली, बेंगलुरू, मुंबई, गुरूग्राम ई. सर्वात प्रदूषित शहरांमध्ये प्रभावी.
  • CE प्रमाणीकरणासह उच्च-कार्यक्षमता आणि कमी-देखरेख लागणारा होम एयर क्लीनर.
  • धुके, वादळ, बांधकाम साईट्स, सण, हिवाळा ई.च्या दरम्यान हवा शुध्द करतात.
  • एयर क्लीनर्सचे “how to” ला शिकण्यासाठी एयर प्युरीफायर विकत घेण्याचे आमचे मार्गदर्शक गाईड वाचा.

केंट एयर प्युरीफायर्सद्वारे काढले जाणारे एयर पोल्यूटंट्स

PM 2.5

कणदार गोष्टी (PM) 2.5 हे हवेत मुक्त झालेले कण असतात ज्याचा व्यास 2.5 मायक्रोमीटर्स किंवा त्याहूनही लहान असतो. हे कण मानवी डोळ्यांना दिसत नाही व थेट मानवी फुफ्फुसांमध्ये शिरतात ज्याने डोळ्यांना व घशाला खाज, खोकला आणि धाप लागणे, फुफ्फुसांचे काम करण्यात घट होणे, हृदयाचे अनियमित ठोके, अस्थमा आणि हृदयविकाराचे झटके इथवरही कारणीभूत होऊ शकतात.

घरासाठीचे केंट एयर प्युरीफायर्स हाय एफीशिएंसी पार्टीक्यूलेट अ‍ॅरेस्टर (HEPA) फिल्टर्सकरवी शुध्दीकरण अवस्थेला PM 2.5 ला काढून टाकून श्वासोच्छ्वासासाठी अनुरूप हवा देतात. फिल्टर कणदार गोष्टी 2.5 ना किंवा 0.3 मायक्रॉन पर्यंतच्या त्याहून लहान कणांना पकडतो व अडकवतो ज्याची अचूकता 99.9% इतकी असते.

धूळ

धूळ एक सर्वसामान्य हवा प्रदूषक आहे जो बांधकाम साईट्स, बागकाम, औद्योगिक कामे, नैसर्गिक खडक, वाळू, जमिनीची धूप ई. पासून निर्माण होतो. नाक आणि गळ्यामध्ये चुरचुरणे, खोकला आणि धाप लागणे, फुफ्फुसचा कामावर परिणाम होणे, हृदयाचे अनियमित ठोके, अस्थमा आणि इतर व्याधींमागील प्रमुख कारणांपैकी धूळही एक आहे.

केंटने भारतासाठी असे एयर प्युरीफायर्स रचित केलेत ज्याने बहुअवस्थांना धूळीचे कण काढले जातात, फिल्टर-पूर्व अवस्थेला धूळीचे कण अडकवले जातात तर अगदीच बारीक धूलीकण HEPA फिल्टर अवस्थेला अडकवले जाऊन ताजी आणि शुध्द हवा दिली जाते.

पालतू जानवरों के बाल

पाळीवांचा कोंडा, केस, कुत्र्यांनी खरवडलेले चामडीचे अगदी लहान तुकडे, त्यांच्या घामातून, लाळ ई.तून अ‍ॅलर्जीस कारणीभूत ठरणारे प्रोटीन हे सर्वसामान्य प्रदूषक आढळतात ज्या घरांमध्ये पाळीव प्राणी असतात. हे महत्त्वाच्या कुटूंब सदस्यांसाठी अ‍ॅलर्जीपूर्ण प्रतिक्रिया सुरू करतात, अस्थमा, खोकला व शिंका, गरगरल्यासारखे, थकल्यासारखे वाटणे, डोळे पाणावणे, धाप लागल्यासारखे होणे, पचनक्रियेच्या समस्या आणि कित्येक आणखी गोष्टी कारणीभूत होऊ शकतात.

सर्वांना आरोग्यदायी जीवन मिळावे यासाठी, केंटने एयर क्लीनर्सची बांधणी केली जे पाळीव प्राण्यांमुळे निर्मित हवा प्रदूषकांना काढून टाकतात व शुध्द हवा मिळवून देतात. बहु-स्तरीय शुध्दीकरणादरम्यान, फिल्टर-पूर्व अवस्थेत पाळीवांचे केस आणि इतर प्राकृतिक प्रदूषकांना अडकवतात तर बॅक्टेरियल रोधक कोटींग हवेतून समस्त बॅक्टेरिया आणि विषाणूंना असक्रिय करून टाकतात.

सिगारेटचा धूर

सिगारेटच्या धूरात हवा प्रदूषकांच्या दोन श्रेणी सामील असतात, सामान्यरीत्या डोळ्यांना दिसणारे PM 2.5 कण ज्यांना धूर म्हणतात आणि कार्बन मोनॉक्सईड आणि बेंझिनसारखे डोळ्यांना न दिसणारे वायू. सिगारेटचा धूर (एकतर सक्रियपणे किंवा निष्क्रीयपणे) थेट मानवी फुफ्फुसांना मारक असतो ज्यामुळे खोकला, धाप लागणे, हृदयाचे अनियमित ठोके, अस्थमा, कर्करोग आणि कित्येक इतर व्याधी कारणीभूत होतात.

केंटने भारतामध्ये घरगुती वापरासाठी सर्वोत्तम एयर प्युरीफायरची रचना केली जो कार्बन फिल्टर स्तराला सिगारेटच्या धूराला अदृश्य असणारे वायू (सिगारेटची दुर्गंध) तसेच HEPA फिल्टर अवस्थेला दृष्य धूर (PM 2.5) पकडून शुध्द करतो व तुमच्या कुटूंबाला श्वास घेण्यास अनुरूप हवा मिळवून देतो.

जेवणावरील वाफा

जेवणावरील वाफा नायट्रोजन डायॉक्साईड निर्माण करतात, ज्याचे दुष्परिणाम कुठल्याही टाकाऊ सामुग्रीच्या ज्वलनामुळे कारणीभूत गोष्टींच्या समान असतात. हवा खेळती नसलेल्या घरांमध्ये जेवणावरील वाफांमुळे श्वसन संस्थेवर परिणाम होऊन आरोग्य बिघडते ज्यामुळे शिंका, खोकला, अनियमित हृदयस्पंदने, अस्थमा आणि कित्येक आणखी गोष्टी कारणीभूत होतात.

केंट एयर प्युरीफायर मशीन्स किचनमध्ये जेवण बनवत असताना निघणारे हानिकारक वायूंना शोषून घेतात. हे वायू हवा शुध्दीकरण प्रक्रियेला सक्रिय कार्बन फिल्टर स्तराला शुध्दीकृत केले जातात.

रंगाच्या वाफा

रंगांच्या वाफांनी कारणीभूत प्रदूषण घराला चुना काढताना किंवा नवे फर्निचर घरी आणल्यावर अनुभवले जाऊ शकते. रंगामध्ये रसायने असतात जी हवेत वायू सोडतात ज्याला ओंगळ वास असे म्हणतात. रंगाच्या वाफांमुळे मुले, वयस्क व्यक्ती आणि श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींना अ‍ॅलर्जी, अस्थमा प्रादुर्भाव, डोकेदुखी, चामडी चुरचुरणे ई. सारख्या समस्या उद्भवू शकतात.

केंटने कमी देखरेख लागणारा एयर प्युरीफायर बनवला जो हवा शुध्दीकरणाच्या दुसर्‍या स्तराला रंगाच्या हानिकारक वाफा काढून टाकतो, सक्रिय कार्बन/कॅटॅलिटीक कार्बन शोषक हवेतून रंगाच्या वाफांना शोषून घेतो व शुध्द हवा सोडतो.

बॅक्टेरिया आणि विषाणू

जिवित जीवधारींमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू अदृष्यपणे असतात जे कुणीही खोकल्यावर, शिंकल्यावर हवेतून प्रसारित होतात,ज्याने संक्रामक व्याधी कारणीभूत होतात. यामुळे मोजबाह्य सर्वसामान्य व्याधी जसे की खोकला, सर्दी, पडसे तसेच काही खरोखरच गंभीर स्थिती कारणीभूत होऊ शकतात.

केंटने हवेला निर्जंतुकीकृत करणारे एयर प्युरीफाईंग मशीन्स रचित केले आहेत. एयर प्युरीफायर्समधील बॅक्टेरिया रोधी कोटींग हवेतील बॅक्टेरिया आणि विषाणूंना अडकवून धरतात व सुरक्षित हवा बाहेर सोडतात.

दुर्गंध

तीव्र दुर्गंध आणि ओंगळ वास विभिन्न रासायनिक प्रतिक्रिया, औद्योगिक आणि कृषी गतिविधी तसेच रॉटिंग प्रक्रियांतून निर्माण होतात. ओंगळ वासामुळे नाकात चुरचुरणे, डोकेदुखी, शिंका आणि अस्वस्थता कारणीभूत होतात.

घरासाठीच्या केंट एयर क्लीनिंग मशीन्समधील जबरदस्त यंत्रणा हवेतील दुर्गंध काढून टाकते. हवा जेव्हा सक्रियकृत कार्बन फिल्टरमधून जाते, तेव्हा वायू/वास अडकवले जातात व केवळ ताजी हवाच वातावरणामध्ये परत सोडली जाते.